प्रतिनिधी/ बेळगाव
भाज्यांचा वापर करुन दागिने तयार करणे, मधुबनी पेंटींग करणे अशा अनोख्या स्पर्धा शारदोत्सव समितीने जाहीर केल्या आणि उत्साही महिलांनी मोठय़ा कल्पकतेने विविध दागिने तयार करुन परीक्षकांचीच परीक्षा घेतली. शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे शनिवारी बौध्दिक स्पर्धा तसेच आयत्यावेळची स्पर्धा आणि मधुबनी पेंटींग स्पर्धा झाली.
महिलांनी गाजर, मुळा, भेंडी, मिरची, कार्ले, स्वीटकॉन, यासह विविध भाज्यांचा वापर करुन वैशिष्टय़पूर्ण दागिने तयार केले. यामध्ये नेकलेस, हार, बांगडय़ा, कानातले डुल, कंबरपट्टा, बिंदी, जोडवी, अंगठी, वाकी, नथ असे अनेक दागिने तयार केले होते. मधुबनी पेंटींग अंतर्गत दुर्गामाता, निसर्ग, भुवनेश्वरी यांच्यासह विविध चित्राकृती महिलांनी रेखाटल्या होत्या. या सर्व वस्तुंचे प्रदर्शन वरेरकर संघाच्या सभागृहात भरविण्यात आले. शारदोत्सवच्या माजी अध्यक्षा विजया धोपेश्वरकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
विविध स्पर्धांमधील विजेत्या पुढील प्रमाणे….
संगीतासवे योग 25 ते 40 वयोगट-1)स्नेहल वेर्णेकर, 2) मुक्त ग्रुप, 3) नक्षत्र, 41 ते 45 वयोगट 1)ओमयोगा, 2)कात्यायनी ग्रुप, 3)प्रेरणाग्रुप, उत्तेजनार्थ अर्चना ताम्हणकर, कविता गांगूर, 55 ते वरील गट 1)प्रेरणाग्रुप, 2)सुचेता लडगे ग्रुप, 3)दिव्य योगा ग्रुप, उत्तेजनार्थ चिन्मय ग्रुप-परीक्षक डॉ. वेदांती गोडबोले, शिवानी उपाध्ये
मधुबनी पेंटींग 1)विद्या देशपांडे, 2)सुमेधा गोखले, 3)मधुरा गोखले, उत्तेजनार्थ अरुणा कुलकर्णी व ईश्वरी कित्तूर, परीक्षक-अशोक ओऊळकर व डॉ. दीपा हळप्पण्णावर
भाज्यांचे दागिने 1)शोभा लोकूर, 2)अरुणा कुलकर्णी, 3)तेजश्री पवार व मिनल पवार (विभागून), उत्तेजनार्थ आरती अनुरे, रेखा देशपांडे व धनश्री हलगेकर (विभागून), परीक्षक शुभांगी जीनगौडा, राजवी दड्डीकर
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्षा माधुरी शानभाग तसेच अरुणा नाईक, किर्ती दोड्डण्णावर, माधवी बापट, संजीवनी खंडागळे, मेधा देशपांडे, निर्मला कळ्ळीमनी यांनी परिश्रम घेतले. प्रवेश व्दारासमोर कविता गांगूर यांनी रांगोळी रेखाटली होती.









