नवी दिल्ली
सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱया स्मार्टफोनचे सादरीकरण शाओमीने केले आहे. यामध्ये रेडमी 9 प्राईम मॉडेल सादर केले आहे. यासारखाच स्मार्टफोन जूनमध्ये स्पेनमध्ये सादर केला आहे. सदर फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असणार आहे. यासोबत रिअर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, 18 वॉट फास्ट चार्जिग सपोर्ट आदी सुविधा मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. रेडमी 9 प्राईम स्मार्टफोन 64 जीबी स्टोरेजसह असणार असून त्याची किंमत 9,999 रुपये असून 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किमत 11,999 रुपये इतकी असल्याचेही सांगितले आहे. सदरचा फोन स्पेस ब्लू, मिंट ग्रीन, मॅट ब्लॅक आणि सनराइज फ्लेयर या रंगांमध्ये उपलब्ध होणार असून 17 ऑगस्टनंतर विक्रीस उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रेडमी 9 प्राइमला 6.5 इंचाचा फुल्ल एचडी डिस्प्ले स्क्रीन असून क्वाड रिअर कॅमेरा सेटअपची सुविधा असणार आहे.









