प्रतिनिधी / कुंकळ्ळी
वेरोडा-तलवडे, कुंकळ्ळी येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण देवीचा वर्धापनदिन (पिंडिकोत्सव) बुधवारी कोविड ‘एसओपी’ पाळून साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सकाळी अभिषेक, हवन व आरती झाली. संध्याकाळी भजन व रात्री पालखी, आरती व तीर्थप्रसादाने उत्सवाची सांगता झाली, असे संस्थान समितीतर्फे कळविण्यात आले आहे.









