प्रतिनिधी /बेळगाव
सांबरा विमानतळ येथे कार्यरत असलेले के. एस. आय. एस. एफ. यांच्यावतीने शांताई वृद्धाश्रम, समर्थनगर अंध आश्रम, महेश फौंडेशन व स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान आश्रम येथे जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्यात आले.
सांबरा विमानतळ येथे के. एस. आय. एस. एफ. हा पोलीस दल सुरक्षेसाठी तैनात आहे. या दलाने सामाजिक बांधिलकी जपत कोरोना महामारीच्या काळात अनेक संस्थांना जीवनावश्यक वस्तुंचे साहित्य दिले आहे.
यावेळी माजी महापौर विजय मोरे, पोलीस दलाचे इन्स्पेक्टर इराप्पा वाली, भाऊराव काजळकर, भरत पाटील, शिवराज पाटील, ईश्वर दंडीनमनी, रूद्रगौडा दळवाई, गुरुदेव गुडापुरे, राजू संगनाळे, भालचंद्र पुजार आदी उपस्थित होते.









