बेळगाव
आचार्य गल्ली, गाडेमार्ग शहापूर येथील श्रीराम मंदिरामध्ये हनुमान जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. देशभरात दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे खबरदारी म्हणून हा उत्सव साधेपणाने झाला आहे.
यानिमित्त पहाटे 5 वा. पंचाभिषेक करण्यात आला. सकाळी 6.27 वा. सूर्योदयावेळी पुष्पवृष्टी करून सुहासिनींच्या हस्ते पाळण्यामध्ये श्रीफळ ठेवून नामकरण सोहळा केला. यावेळी हनुमान मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आले होते. तसेच विधिवत पूजा-अर्चा करून देवाकडे कोरोनाच्या संकटातून वाचविण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी वारकरी मंडळाचे अध्यक्ष हभप लक्ष्मण बन्नार, कशमहाराज नार्वेकर, आदीनाथ लाटकर, शेखर हंडे, सुधीर कालकुंद्रीकर, राजाराम नार्वेकर, सुभाष देशपांडे, मोहन मेलगे, राजशेखर होसूरकर, वैजनाथ उसुलकर आदीसह राम नाम जप महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.









