शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद
प्रतिनिधी / बेळगाव
पत्नी सोडून गेल्याने मानसिक संतुलन बिघडलेल्या बसवाण गल्ली, शहापूर येथील एका व्यक्तीचा शोध वर्ष उलटले तरी लागला नाही. याबाबत त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत आहेत. लक्ष्मण शंकर मरवे (वय 40) असे त्याचे नाव आहे. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
लक्ष्मण मरवे हा दि. 14 सप्टेंबर 2019 रोजी घरातून बाहेर गेला तो अजूनही परतलाच नाही. त्याची पत्नी त्याला काही वर्षांपूर्वी सोडून गेली.
मुलेही पत्नीनेच नेली. त्यामुळे लक्ष्मण याचे मानसिक संतुलन बिघडले. त्यातूनच तो बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले.
घरातून बाहेर पडताना त्याने अंगावर निळा, तांबडा, पिवळा पट्टेरी शर्ट व निळय़ा रंगाची पॅन्ट परिधान केली होती.
तो कन्नड, मराठी आणि हिंदी भाषा बोलतो. तरी सदर व्यक्ती कोणालाही आढळल्यास शहापूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









