गुरुवारी 379 जणांना बाधा, 14 जण दगावले, पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांचाही समावेश
प्रतिनिधी बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरात कोरोनाचा झपाटय़ाने फैलाव वाढत चालला आहे. गुरुवारी जिल्हय़ातील एकूण 379 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 164 जणांचा समावेश आहे तर गेल्या 24 तासांत चौदा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून बेळगाव शहरातील बाधितांची संख्या त्यामध्ये अधिक आहे.
बेळगाव शहर व उपनगरातील 130 व ग्रामीण भागातील 34 असे एकूण बेळगाव तालुक्मयातील 164 जणांचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. कणबर्गी, अनगोळ, खासबाग यासह कुडची ता. रायबाग, रामदुर्ग, देवलापूर ता. बैलहेंगल, सौंदत्ती, बैलहोंगल, कागवाड, हुक्केरी येथील एकूण 14 बाधितांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी केवळ सिव्हिल हॉस्पिटलमधील आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हा आकडा मोठा आहे. आतापर्यंत 6 हजार 640 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी 2928 जण पूर्णपणे बरे झाले आहेत 3599 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. तर आणखी 281 जणांचे अहवाल यायचे आहेत.