पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांतील 121 परवानाधारकांचे शस्त्रास्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी सोमवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
शस्त्रास्त्र परवानाधारकांनी परवान्यासंबंधीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जर परवाना रद्द व्हायचा नसेल तर काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याचे आवाहनही पोलीस उपायुक्तांनी केले आहे. शस्त्रास्त्र कायदा-1959 अन्वये परवाने रद्द करण्यात आले आहेत.
परवानाधारकांनी मुदतीत आपल्या परवान्यांचे नूतनीकरण करून घ्यावे. सक्षम प्राधिकरणाकडून सूचना येईल त्यावेळी आपल्याजवळील शस्त्रs पोलीस स्थानकात जमा करावी. घरचा पत्ता बदलल्यास यासंबंधी संबंधित पोलीस स्थानकाला माहिती देणे. नव्याने परवाना मंजूर झाल्यानंतर शस्त्रास्त्र नियम-2016 च्या कलम 18 अनुसार दोन वर्षांत शस्त्र खरेदी करून परवाना पत्रात त्याची नोंद करून घ्यावी, असे आवाहनही पोलीस उपायुक्तांनी केले आहे. नियम न पाळणाऱया 121 परवानाधारकांचे शस्त्रास्त्र परवाने रद्द करण्याचा निर्णयामुळे परवानाधारकांत खळबळ माजली आहे. बेळगाव शहर व तालुक्मयासंबंधी हा निर्णय असून जर शस्त्रास्त्र परवाना रद्द व्हायचा नसेल तर परवानाधारकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही डॉ. विक्रम आमटे यांनी केले आहे.









