सोनी मराठी वाहिनी नेहमीच नव्या धाटणीच्या मालिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करते. अशीच एक नवी मालिका तू सौभाग्यवती हो सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेमध्ये एक नवीन, बोलक्या डोळ्यांचा आणि ताजा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि तो आहे दीक्षा केतकर या अभिनेत्रीचा. दीक्षाची ही पहिलीच मालिका आहे. दीक्षा ही शशांक केतकरची बहीण आहे.
दीक्षाबरोबरच या मालिकेमध्ये हरीश दुधाडे, ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर हे कलाकारही आहेत. या प्रोमोमध्ये दीक्षा खूप निरागस आणि हसरी दिसते आहे. या नव्या चेहर्याला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. वयाने खूप मोठय़ा असणाऱया व्यक्तीबरोबर ऐश्वर्या का लग्न करते आणि जाधव घराण्याची सून कशी होते, हे पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहे. मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.









