प्रतिनिधी / कोल्हापूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार कोल्हापुरात दाखल झाले आहेत. पवार यांच्या हस्ते उद्या, शुक्रवार दि. २२ रोजी महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्हा परिषद आवारातील पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तसेच त्यानिमित्त पोलीस परेड ग्राऊंडवर जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
दरम्यान, शरद पवार शासकीय विश्रामगृह येथे आल्यानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए वाय पाटील, के पी पाटील, आणदार पी एन पाटील, राजेश पाटील, व्ही बी पाटील, आर के पोवार, बाबासाहेब पाटील- असुर्लेकर आदी उपस्थित होते.
शुक्रवारी होणारा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने जय्यत तयारी केली आहे. यावेळी पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजला बांधकामाचा शुभारंभही करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









