नवी दिल्ली
व्होडफोन-आयडियाने दोन नवीन प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. कंपनीने 109 रुपये आणि 169 रुपयांचे प्लॅन जाहिर केले आहेत. सदरच्या दोन्ही प्लॅनची वैधता ही 20 दिवस राहणार आहे. यामध्ये डाटा आणि कॉलिंगसोबत अन्य सुविधा मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सुरुवातीच्या काळात हा प्लॅन दिल्ली ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. 109 रुपयाच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सोय मिळणार असून सोबत 1 जीबी डाटा आणि 300 एसएमएस मिळणार आहेत. यासोबत व्होडाफोन प्ले आणि झी 5 ऍप्सचे मोफत सबास्क्रिप्शन मिळणार आहे. 169 च्या प्लॅनमध्ये कॉलिंग सुविधेसोबत 1 जीबी डाटा नियमित आणि रोज 100 एसएमएस मिळणार आहेत.









