गटशिक्षणाधिकारी रेवती मठद : बेडकिहाळ येथे सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
वार्ताहर / बेडकिहाळ
जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकांना स्पर्धेची गरज असते. त्यामुळे स्पर्धेतून आपले जीवन घडत असते. निपाणी विभागात गत आठ वर्षांपासून निपाणी तालुक्मयाचे शारीरिक शिक्षण पर्यवेक्षक म्हणून व्ही. के. सनमुरी यांनी प्रामाणिक व कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेली सेवा अनमोल असल्याचे मत निपाणीच्या गटशिक्षणाधिकारी रेवती मठद यांनी व्यक्त केले.
बेडकिहाळ-शमनेवाडी येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावती मिर्जी महाविद्यालयाच्या सभागृहात प्राथमिक व माधमिक शाळा शारीरिक शिक्षण शिक्षक संघ निपाणी यांच्यावतीने व्ही. के. सनमुरी व विभागातील इतर आठ क्रीडा शिक्षकांच्या सेवानिवृत्तीनिमित्त तसेच बदली झालेल्या शिक्षकांच्या सत्कार समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बी. एस. पदवीपूर्व महाविद्यालयाचे उपाध्यक्ष तात्यासाहेब खोत होते.
सत्काराबद्दल व्ही. के. सनमुरी व अन्य शिक्षकांनी कृतज्ञता व्यक्त केली. निपाणी तालुका शारीरिक शिक्षण पर्यवेक्षकपदाची जबाबदारी सदलगा हायस्कूलचे क्रीडा शिक्षक एस. आर. नोरजे यांच्याकडे देण्यात आली. क्रीडा शिक्षक व्ही. के. गुरव, सी. बी. कोंडेकर, सुनील पडलाळे, एस. ए. यल्लट्टी, देवनावर आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास अनिल मलगत्ते, बीआरसी अधिकारी पी. एम. मकानदार, जयपाल देसाई, के. एम. गुरव, महादेव कोरव, निपाणी विभाग शारीरिक शिक्षण शिक्षक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सीआरसी प्रमुख, हायस्कूल, प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. एस. जी. खनगौडर यांनी सूत्रसंचालन, एस. एन. भुर्लाट्टी यांनी परिचय, उपप्राचार्य डी. ए. माने यांनी स्वागत तर ए. एम. सौंदलगे यांनी आभार मानले.









