चंदगड / प्रतिनिधी
स्थानिक व्हाट्सअप ग्रुप वर टाकलेल्या पोस्टवरून झालेल्या वादाचे पर्यवसान एकास मारहाण करण्यात झाले असून तिघांविरुद्ध चंदगड पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शिनोळी खुर्द येथील सागर यल्लाप्पा गुडेकर यांचे राधेश्याम ज्वेलरी शॉप आहे. शिनोळी येथील व्यापाऱ्यांचा ‘स्थानिक व्यापारी’ नावाचा व्हाट्सअप ग्रुप आहे. त्या ग्रुपवर सागर गुडेकर यांनी आपले घर, जमीन इत्यादी प्रॉपर्टी विकण्याची असल्याची पोस्ट शेअर केली. शेअर केलेल्या पोस्टवर वैजनाथ मारुती मेणसे, श्रीकांत बामुचे, उमाजी लक्ष्मण ओऊळकर यांनी रिप्लाय पोस्ट टाकून वाद करून शिवीगाळ केली.
त्या वादाच्या रागातून या तिघांनी सागर गुडेकर यास त्याच्या दुकानात घुसून हातावर, तोंडावर, डोक्यावर ठोशाने मारहाण करून दुखापत केली. तसेच रात्री पन्नास गावगुंड घेऊन येऊन तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली. याप्रकरणी सागर गुडेकर यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला असून तपास पोलीस नाईक भूषण महापुरे करीत आहेत.