प्रतिनिधी / कागल
कागल – मुरगूड राज्य मार्गावर व्हन्नूर फाटा येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची दुर्घटना रविवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. या अपघातात मूळचे हळदी ता. कागल (सध्या रा.गोरंबे ) येथील हणमंत नानासो पाटील ( वय -४५ ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी हणमंत पाटील हे आपली मोटरसायकलवरून (स्प्लेडर क्र.एमएच ०९ एजे- ५७२२ ) सकाळी ६ च्या सुमारास कागल येथील पंचतारांकीत वसाहतीकडे कामावर निघाले होते. व्हन्नूर फाटा येथे आले असता मुरगूडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने ( क्र. एमएच ०६ के. ७१७८ ) पाटील यांच्या दुचाकीस समोरून जोराची धडक दिली.
या धडकेत हणमंत पाटील हे गंभीर जखमी झाले. यावेळी त्यांचा जागीच मृत्यु झाला. पाटील हे मुळचे हळदी येथील रहिवाशी आहेत. पण कामाच्या ठिकाणी जाणे सोयीस्कर होणेसाठी पत्नीच्या गावी गारंबे ता. कागल येथे घर बांधून वास्तव्य करत होते. गेली १२ वर्षे ते एका कंपनीत काम करत होते. त्यांच्या पश्चात आई – वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. याबाबतची फिर्याद रंगराव पांडूरंग पाटील यांनी कागल पोलिसांत दिली आहे.अधिक तपास कागल पोलीस करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









