टॉन्सिल्सची व्याधी सर्व प्रकारच्या वयोगटातील व्यक्तींमध्ये आढळून येत असली तरी लहान मुलांमध्ये या व्याधीचे प्रमाण अधिक दिसून येते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास टॉन्सिल्समधून विषद्रव्ये बाहेर पडून रक्त दुषित करून टाकतात. त्याचा परिणाम आपल्या हृदयावर होण्याची शक्यता असते.
टॉन्सिल्सची व्याधी जडण्यास सतत मसालेदार पदार्थ खाणे हे एक प्रमुख कारण सांगितले जाते. तसेच नेहमी चढय़ा आवाजात बोलण्याने ही व्याधी होते, असेही सांगितले जाते. धुम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे, टॉफीज, गोड पदार्थ, आईस्क्रीम अतिप्रमाणात खाणे यामुळेही ही व्याधी होते. थंड पाण्यावर गरम पाणी पिणे किंवा गरम पदार्थांवर थंड पदार्थ खाणे अशा प्रकारांमुळेही ही व्याधी होते. व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळेही ही व्याधी होऊ शकते.
आयुर्वेदानुसार अगस्त्य रसायन मधाबरोबर दररोज दोन वेळा घेणे या व्याधीवर गुणकारी ठरते. याचबरोबर सितोफलादीचुर्ण हे औषधही या आजारावर उपयुकत ठरते.









