जिल्हाधिकाऱयांना दिले निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वार्ड क्रमांक 10 कडे महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. कचऱयाची उचल वेळेत नाही. गटारींचे पाणी निचरा होणे कठीण झाले आहे. स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी नाहीत. त्यामुळे सर्वत्र कचऱयाचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरली आहे. तेंव्हा तातडीने महापालिकेला स्वच्छना करुन या वार्डामध्ये स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
वार्डक्रमांक 10 मधील संभाजी गल्ली, रामामेस्त्राr अड्डा, कपिलेश्वर मंदिर परिसर, पाटील गल्ली परिसर, शिवाजी रोड, तांगडे गल्ली, भांदुर गल्ली, पाटील मळा, ताशिलदार गल्ली, स्टेशन रोड यासह इतर परिसरात सर्वत्र कचऱयाचे साम्राज्य पसरले आहे. केवळ तीनच व्यक्ती मोठय़ा परिसराला स्वच्छ करण्यासाठी नेमण्यात आले आहेत. मात्र त्यांचे वय झाल्याने त्यांना काम करणेही अवघड झाले आहे. तेंव्हा अधिक माणसे नेमून स्वच्छता करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
सर्वत्र अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरली आहे. आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरत आहे. तर काही ठिकाणी पाणी साचून राहत आहे. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करुन हा वार्ड स्वच्छ करण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले.









