मुंबई
अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील कंपनी वेदांता लिमिटेडचा चालू आर्थिक वर्षात (2020-21) जूनला संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफा 23 टक्क्यांनी घटला आहे. कंपनीचा एप्रिल ते जूनपर्यंतच्या तिमाहीतील निव्वळ नफा 1033 कोटी रुपयांचा होता. हाच नफा मागच्या वर्षी याच कालावधीत 1 हजार 351 कोटी रुपये इतका होता. चालू आर्थिक वर्षात समान कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न 16 हजार 998 कोटी रुपये इतके नेंदले गेले. मागच्या वर्षी ते 21 हजार 754 कोटी रुपये इतके होते. म्हणजेच एकूण उत्पन्नात देखील 21 टक्के घट झाल्याचे समोर आले.









