वार्ताहर / वेंगुर्ले:
वेंगुर्ले तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात निकोप व चांगल्या प्रतीचे आणावे. खरेदी-विक्री संघाच्या या भात खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालिका तथा ख.वि.संघ वेंगुर्लेच्या संचालिका सौ. प्रज्ञा परब यांनी भात खरेदी शुभारंभ प्रसंगी केले. वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री सहकारी संघातर्फे आज गुरुवारी खरीप हंगामातील भात खरेदीचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालिका व वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या संचालक सौ. प्रज्ञा परब यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरात वेंगुर्ले तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन एम. के. गावडे, संघाचे लेखापाल विकास कुबल, वैष्णवी तळकर, हेमंत नाईक, शेतकरी रवींद्र राऊळ, सौ. रसिका राऊळ, संतोष परब, गणेश येरम, मिलिंद रेडकर, महेश परब,प्रदीप राणे आदींचा समावेश होता. वेंगुर्ले तालुका सहकारी खरेदी विक्री संघातर्फे 1940 रुपये क्विंटल दराने भात खरेदीचा दर निश्चित करण्यात आला असून त्याप्रमाणे वेंगुर्ले कँम्प येथील खरेदी विक्री संघाच्या गोदामाच्या ठिकाणी भात खरेदी करण्यात येत आहे. वेंगुर्ले तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले भात संघाच्या कँम्प येथील गोदामात शासनाकडून अद्याप बोनस जाहीर करण्यात आलेला तो जाहीर झाल्यानंतर संबधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती वेंगुर्ले तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालिका सौ. प्रज्ञा परब यांनी दिली.