वेंगुर्ला/प्रतिनिधी-
अकरा दिवसापूर्वी बांदा गाळेल येथे डोंगर कोसळून झालेल्या दुघँटनेत मयत झालेल्या मठ टाकयेवाडी येथील क्रीकेटपटू गीतेश गावडे याला वेंगुर्ले तालुका वासियांतफेँ मठ येथील सयंभू मंगल कार्यालयात श्रद्धांजली वाहाण्यात आली.
मठ ग्रा. पं. ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास शोधमोहीम यशस्वी पणे राबविणारे एनडीआर एफचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आमदार दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हा धिकारी के. मंजूलश्रमी, सावंतवाडी चे तहसीलदार राजाराम म्हात्रे, महसुल कर्मचारी, बांदा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व कर्मचारी, सावंतवाडी पं. स. च्या गटविकास अधिकारी, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, जि. प. सदस्य, जेसीपीलोडरचे मालक आणि कर्मचारी, वेंगुर्ले नगरसेवक नागेश गावडे
बांदा सरपंच अक्रम खान, ग्रा. पं. सदस्य, एनडीआर एफच्या जवानांना व ईतर लोकांना जेवण व चहापाणी याची व्यवस्था करणारे बांदा सटमटवाडी येथील परब कुटुंबिय, साईप्रसाद काणेकर , निलेश कदम, जय भोसले, ऋषी हरमलकर, सचिन वीर, हुसेन मकानदार या व ईतर मदत करणाऱ्या सर्वाप्रती यावेळी कुतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील शेकडो क्रिकेटपटू तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक मठ सरपंच तुलशीदास ठाकूर तर सुत्रसंचलन व आभार रविंद्र खानोलकर यांनी मानले.









