बेंगळूर
तैवानची विस्ट्रॉन कॉर्प यांनी भारतात इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीसाठी ऑप्टीमसशी करार केला आहे. याअंतर्गत पुढील 3 ते 5 वर्षाच्या कालावधीत 200 दशलक्ष डॉलर्सची रक्कम गुंतवली जाणार असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कंपन्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची भारतात निर्मिती करत आहेत. स्मार्टफोन व लॅपटॉपसह इतर उत्पादने तयार केली जाणार असून नवी दिल्लीच्या कारखान्यांमध्ये 11 हजार जणांची भरतीही होणार असल्याचे समजते.









