शिराळा / वार्ताहर
विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोधची परंपरा सलग पाचव्यांदा कायम राहिली आहे. माजी आमदार शिवाजीराव नाईक व जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केले असल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली
यावेळी आमदार नाईक म्हणाले, विश्वासराव नाईक सहकारी कारखाने सभासदांचा विश्वास जपला आहे. योग्य कारभाराबरोबरचं योग्य टेक्नॉलॉजीचा वापर करत सहविजनिर्मितीसह मद्यनिर्मिती प्रकल्प उभारून शेतकऱ्यांच्या च्या ऊसाला एफआरपीसह योग्य भाव देण्यासाठी कायमचं प्रयत्नशील आहे. सुरवातीला कारखान्याची गाळप क्षमता २५००टन होती. ती गाळप क्षमता आज ५३००पर्यंत केली आहे. तर पुढील वर्षी पर्यंत कारखान्याची गाळप क्षमता ६००० पर्यंत करणारं असून सभासद व ऊस उत्पादक यांच्या विश्वासास पात्र राहण्यासाठी प्रयत्नशील राहणार. तसेच कारखान्याच्या निवडणुकीसाठी सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार होतो. असे हि आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.