कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाडमध्ये समस्त सुतार लोहार समाजाच्यावतीने विश्वकर्मा जन्म उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळयानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बाजारपेठमध्ये असलेल्या संत नामदेव मंदिरात विश्वकर्मा जयंती निमित्त संत विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन, आरती, नैवेदय महाप्रसाद तसेच विविध कार्यक्रम आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सुतार–लोहार समाजातील महिलांची संख्या लक्षणीय उपस्थिती होती. यानिमित्त मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई व सुंदर आरास करण्यात आली होती. विश्वकर्मा प्रतिमा पूजन व धार्मिक विधी पौराहित्य वसंत कुलकर्णी यांनी केले.
विश्वकर्मा जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम प्रसंगी विष्णू सुतार, गजानन सुतार, सुनील लोहार रमेश सुतार, सुभाष सुतार यांचेसह तालुक्यातील सुतार–लोहार समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. यानिमित्त आयोजित केलेल्या महाप्रसादाचा शेकडो समाज बांधवांनी लाभ घेतला.









