वृत्तसंस्था/न्यूयॉर्क :
कोरोना संदर्भातील प्रतिबंधक नियमाचे उल्लंघन केल्याने अमेरिकन टेनिसपटू डॅनेली कॉलिन्सची विश्व सांघिक टेनिस स्पर्धेमधून हकालपट्टी केल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली. वेस्ट व्हर्जीनिया येथील विश्व सांघिक टेनिस स्पर्धेवेळी कॉलिन्सने कोरोना संदर्भातील नियमाचे उल्लंघन केले होते.
वेस्ट व्हर्जीनिया येथे विश्व सांघिक टेनिसतर्फे तीन आठवडय़ांचा टेनिस हंगाम सुरू झाला होता. त्यावेळी उत्तर अमेरिकेतील काही मोजक्या शौकिनांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली होती. कॉलिन्सने ग्रीनब्रियर रिसॉर्टमधून परवानगीशिवाय बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. या कारणास्तव कॉलिन्सची विश्व़ सांघिक टेनिस उर्वरित भागासाठी हकालपट्टी केल्याचे कार्लोस सिल्वा यांनी सांगितले. 2019 च्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत कॉलिन्सने उपांत्य फेरी गाठली होती.









