प्रतिनिधी/ पणजी
वेतन वाढ व आपल्या इतर विविध मागण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बॅक युनियन अंतर्गत येणाऱया बॅंकच्या कर्मचाऱयांनी काल राज्यभर बंक बंद आंदोलन केले. राजधानी पणजीतही काल बँक कर्मचाऱयानी रॅली काढली यावेळी शेकडो कर्मचारी उपस्थित होते. मागण्या मान्य केल्या नाहीतर बेमुदत संपावर जाण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला.
युनायटेड फोरम ऑफ बॅक युनियनतर्फे पुकारण्यात आलेल्या या दोन दिवसीय संपामध्ये गोव्यातील सुमारे 5 हजार बंक कर्मचारी सहभागी झाले होते. या संपानंतर मागण्या मान्य झाल्या नाहीतर 11 ते 13 मार्च असे तिन दिवस संप पुकारला जाणार आहे. तरी मागण्या मान्य झाल्या नाहीतर 1 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा ईशारा या शाखेचे गोव्याचे संयोजक संतोष हळदणकर यांनी सांगितले.
बंक कर्मचाऱयाचा पगार मागिल पाच वर्षापासून वाढलेला नाही पगार वाढीविषयी बंक कर्मचाऱयांनी अनेक वेळा आंदोलन केले आहे. तसेच नवी पेन्शन योजना, पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा, पेन्शन रक्कम वाढ, बँकच्या कत्राट कामगारांना समान वेतन देणे अशा अनेक मागण्या या बँक कर्मचाऱयांनी केल्या आहेत.
सलग दोन दिवस बॅंकच्या कर्मचाऱयांनी संप पुकारला अनेक ठिकाणी व्यवसाय ठप्प झाला होता. काही खासगी कर्मचाऱयांचा पगार या बँकामध्ये झाला नाही. तसेच एटीएममध्ये पैसे लोकांना मिळाले नाही. लहान व्यवसायिकांना याचा जास्त फटका बसला आहे.









