प्रतिनिधी / सातारा
विरोधकांच कामच असतं. सरकारच्या एखाद्या निर्णयावरती एखाद्या बाबीवर टीका करण्यासाठीच विरोधक असतात. त्यांनी त्यांच काम करत रहावं सरकार आपलं काम करत राहील.विरोधक सत्तेत होते त्यावेळी खालच्या पातळीवर टीका होत होती का ? हा त्यांनी विचार करायला हवा होता.
ठाकरे सरकारची भूमिका राज्याचा आश्वासक विकास जो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सरकार स्थापन झाल्या झाल्या दिला आहे. ती वचन ती आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल करायची. जी काय संकट समोर येतील ती दूर करून किती ही अडचणी आणल्या तरीही महाविकास आघाडी सरकार डगमगणार नाही, मुख्यमंत्री ठाकरे यांचे खंबीर नेतृत्व शिवसेनेला लाभले आहे. असे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविलेल्या आयकर नोटीसीबाबत ही त्यांना छेडले असता ते म्हणाले आयकर विभाग केंद्र शासनाचा आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या नोटीसीला उत्तर दिले आहे. केंद्र सरकार त्यांच्या अधिकाराचा वापर करत असेल, असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या अनुषंगाने शिवसेनेच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.