प्रतिनिधी / सुमित तांबेकर
बेर्तोडा, फोंडा येथे आज दि. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी गोव्याच्या राजकारणावर भाष्य करताना विरोधी राजकीय पक्षांवर टिकास्त्र सोडले. यावेळी फोंडा नगरपालिकेचे नगरसेवक रितेश नाईक तसेच रॉय नाईक उपस्थित होते.
यावेळी रवी नाईक यांनी सर्वप्रथम गानसम्राज्ञी लता मंगेशकर व ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वाघ यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांनी गोव्याच्या राजकारणावर आपली मते व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाची तयारी ही गोव्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुर्ण झाली आहे. यावेळी बोलताना भारतीय जनता पक्ष हा गोवा विधानसभेत कमीत कमी 27 जागांवर निवडून येणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला, तसेच भाजपने केवळ गोव्यातच नाही तर संपूर्ण देशात कोरोनासारख्या महामारीत अतिशय संवेदनशीलपणे काम केले आहे. तसेच कोरोना संसर्गाला फैलाव होण्यासाठी रोखल्याचे यावेळी म्हणाले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला गोव्यासाठी नुकत्याच एका नवीन तब्बल पाच हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याचे ते यावेळी म्हणाले.
भाजपला विरोध करण्यासाठी आता विरोधक गोमंतकीयांना चंद्र तारे ही तोडून आणून देऊ अशा वल्गना करतील
नाईक यांनी यावेळी भाजप सरकारने गोव्याचा विकास करताना कोणत्याही जाती धर्माला वेगळे न ठेवता सगळ्यांनी एकत्र येत गोव्याचा विकास केल्याचे ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर गोवा स्वतंत्र झाला त्या पासून ते आतापर्यंत समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येत गोव्याच्या विकासात हातभार लावल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच फोंडा मतदारसंघात विकास करण्यासाठी आपण मतदारसंघातील आरोग्य यंत्रणा अजून सक्षम करण्यासाठी रुग्णालय उभारणार आहे. तसेच सामान्य युवकांना पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी फोंडा सारख्या ठिकाणी ग्रंथालय उभारणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.
आज गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्ष हे केवळ नागरिकांना पैसे देऊन मत वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र गोमंतकीय हे विचार करणारे नागरिक असून ते केवळ पैसे आणि इतर आमिषांना बळी न पडता विचारपूर्वक मतदान करतील आणि भाजपची सत्ता येण्यास काहीच अडचणी नसल्याचं ते यावेळी म्हणाले.