ऑनलाईन टीम / पटना :
आज सकाळी दिल्लीहून पटनाला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा दावा करणारा फोन एका तरुणाने केला. या फोननंतर दिल्ली विमानतळावर मोठा गोंधळ उडाला.
दिल्ली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून फोन करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत हा तरुण मानसिकदृष्ट्या आजारी असून, त्याने हा फेक कॉल केल्याचे समोर आले आहे. या तरुणाची चौकशी अद्याप सुरू असून, तपास संपल्यानंतर यासंदर्भात माहिती दिली जाईल, असे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले.









