प्रतिनिधी /परूळे:
मुंबई ते सिंधुदुर्ग आणि रिटर्न हाऊसफुल्ल अवघ्या तासाभरात २० ऑक्टोबरपर्यंतची तिकिटे संपली मुंबई ते सिंधुदुर्ग आणि रिटर्न ‘ या हवाई प्रवासाची तिकीट विक्री २३संप्टेबर रोजी सुरू झाली , पण अवघ्या तासाभरातच २० ऑक्टोबरपर्यंतचे आरक्षण फुल्ल झाले . ९ ऑक्टोबर पासून परूळे-चिपी विमानतळावर सिंधुदुर्गात हवाईसेवा सुरू होणार आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, ऊद्योगमंत्री सुभाष देसाई ,खासदार विनायक राऊत, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आमदार दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक आमदार नितेश राणे याच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे एअर इंडियाच्या ‘ अलायन्स एअर ‘ या उपकंपनीमार्फत मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमान उडणार आहे . मुंबई ते सिंधुदुर्गसाठी २५२० रुपये तर सिंधुदुर्ग ते मुंबई परतीच्या प्रवासासाठी २६२१ रुपये तिकीट दर आहे . दररोज सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी मुंबईहून निघालेले विमान दुपारी १ वा . चिपी येथे उतरेल . तर परतीचा प्रवास दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी सुरू होईल आणि विमान २ वाजून ५० मिनिटांनी मुंबईत पोहोचेल . तिकीट शिल्लक नाही सिंधुदुर्गच्या विमानसेवेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे . एअर इंडियाने कालपासून तिकीट विक्रीला सुरुवात केली , पण अवघ्या तासाभरातच २० ऑक्टोबरपर्यंतचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती एअर इंडियाच्या वेबसाईटवर दिसते आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









