वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामधील दिग्गज उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी विप्रोमधील 2020 मध्ये प्राप्त होणाऱया कमाईमधील हिस्सा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोबत त्यांचा मुलगा आणि कंपनीचे चेअरमन रिशद यांनीही तसा निर्णय घेतला आहे.
कोविड19 चा वाढता संसर्ग आणि त्यामुळे निर्माण होणारी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी विविध पातळय़ांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. सामाजिक उत्तरदायित्वाचाच एक भाग म्हणून अझीम प्रेमजी व त्यांच्या सुपुत्राने वरील निर्णय घेतलेला आहे.
रिशद यांचे वेतन घटले
वडिलांनी घेतलेल्या निर्णयाचा प्रभाव रिशद यांच्या वेतनावर पडला असल्याचे दिसून आले आहे. त्यांचे एकूण कम्पेनसेशन 31 टक्क्मयांनी घटून 6.83 लाख डॉलर्सवर आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आबिदली नीमचवाला यांचे वेतन मात्र 12 टक्क्मयांनी वधारले आहे.
संस्थापकांची समाजसेवेतील ओळख
विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. कंपनी आणि अझीम प्रेमजी फाउंडेशनच्यावतीने 1 हजार कोटीपेक्षा अधिकची रक्कम कोविडच्या लढय़ासाठी दिले आहेत. यातूनच त्यांच्या समाजकार्याची ओळख समोर येत असल्याचे दिसून येते.









