नवी दिल्ली
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी विप्रोने ऑस्ट्रेलियातील ऍम्पीयन कंपनीचे अधिग्रहण करण्याचे निश्चित केल्याचे समजते. सदरच्या अधिग्रहणासाठी कंपनीने 875 कोटी रुपये मोजले आहेत, असे कळते. सायबर सुरक्षा प्रणालीसंदर्भात कार्य करणारी ऍम्पीयन ही ऑस्ट्रेलियातील कंपनी असून येणाऱया काळात सायबर सुरक्षेबाबतच्या योजना आत्मसात करण्यावर भर दिला जाणार असल्याचे विप्रोकडून सांगण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडमधील ऍम्पीयनच्या ग्राहकांचा लाभ भविष्यात विप्रोला होणार आहे. अनेक नियम अटींच्या तत्वावर सदरचे अधिग्रहण होणार आहे. सदरची यासंदर्भातील मंजुरीची कामे 30 जून 2021 पर्यंत पूर्ण होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ऍम्पीयनचे मुख्यालय मेलबर्नमध्ये असून सिडनी, ब्रिस्बेन व कॅनबेरा येथे त्यांची कार्यालये आहेत.









