बेंगळूर
आयटी किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सेवा बजावणारी कंपनी विप्रोने आपल्या 80 टक्के कर्मचाऱयांना वेतनवाढ देणार असल्याची घोषणा केली आहे. सदरची वेतनवाढ कर्मचाऱयांकरीता 1 सप्टेंबर 2021 पासून अंमलात येणार आहे. कॅलेंडर वर्षामध्ये कंपनीने दुसऱयांदा आपल्या कर्मचाऱयांच्या वेतनामध्ये वाढ केलेली आहे. याआधी जानेवारी 2021 मध्ये कंपनीने वेतनवाढीसंदर्भात घोषणा केली होती. सी 1 बँड अंतर्गत येणाऱया सर्व कर्मचाऱयांना सदरची वेतनवाढ लागू होणार आहे, असे विप्रोच्यावतीने सांगण्यात आले आहे.









