प्रतिनिधी / पुसेसावळी
खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी येथे गुरुवारी रात्री बेकायदा बिगरपरवाना वाळू उत्खनन केल्याप्रकरणी सुर्यकांत उर्फ बाळू वसंत शिंदे (वय-३० वर्षे, रा.गोरेगाव वांगी) याला औंध पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून वाळू व ट्रॅक्टर, ट्रॉली असा सुमारे ५ लाख ९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, २ जुलैला रात्री सुमारे सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सुर्यकांत शिंदे हा गोरेगाव वांगी ते जयरामस्वामी वडगाव जाणाऱ्या रोडवर वाळूची चोरटी वाहतूक करत होता.
सदरची माहिती मिळताच पोलीस प्रशांत पाटील, कुंडलिक कटरे यांनी त्या ठिकाणी जावून त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. याप्रकरणी प्रशांत पाटील यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस नाईक राहूल वाघ करीत आहेत.








