प्रतिनिधी / गोडोली
”पदवीधर, शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांप्रमाणे आता सरपंचामधून विधान परिषदेवर एक प्रतिनिधीत्व असावे. ग्रामीण विकासासाठी योगदान देणाऱ्या सरपंचांचा प्रतिनिधी विधान परिषदेत असायला हवा,”अशी मागणी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी केली आहे. पुणे येथे सरपंच परिषदेची बैठक पार पडली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अनिल गित्ते, अँड.विकास जाधव, प्रसिध्दी प्रमुख संजय जगदाळे, सातारा जिल्हाध्यक्ष आनंदा जाधव तसेच राज्यभरातील काही मान्यवर सरपंच यावेळी उपस्थित होते.
सरपंच परिषदेचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून ग्रामविकासासाठी सरपंच परिषदेच्या विविध मागण्या मांडणार आहे. प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असून सरपंच हा संस्थेचा प्रमुख आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सरपंचामधून विधानपरिषदेवर मिळाल्यास ग्रामीण विकासाला अधिक चालना मिळेल. तसेच सरपंच, सदस्यांचे प्रश्न थेट सभागृहात मांडल्यानंतर त्यांना योग्य न्याय मिळेल, “असे त्यांनी सांगितले.









