जीएसएस कॉलेजतर्फे व्ही. एस. पाटील हायस्कूल मच्छे येथे उपक्रम
बेळगाव :जीएसएस कॉलेजच्या प्राणीशास्त्र विभागातर्फे विविध पक्ष्यांची माहिती शालेय विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम सुरू आहे. गुरुवारी मच्छे येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पक्ष्यांची माहिती प्रोजेक्टरद्वारे करून देण्यात आली. जीएसएस कॉलेजचे प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. ए. ए. हलगेकर, प्रा. शशांक बोरकर व डॉ. बसवराज गौंडाडकर यांनी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील होते.
प्रारंभी प्रा. विक्रम पाटील व मान्यवरांनी रोपटय़ाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रा. ए. ए. हलगेकर यांनी विविध पक्ष्यांची माहिती व त्यांचे अन्नपदार्थ याबद्दल प्रोजेक्टरद्वारे माहिती दिली. तसेच पक्ष्यांचे आवाजही ऐकविले. यावेळी एसकेई सोसायटीच्या जीएसएस कॉलेजतर्फे पक्ष्यांचे तीन डिजिटल फलक शाळेला भेट देण्यात आले.
प्रारंभी मुख्याध्यापक एस. बी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन पी. एम. पाटील यांनी केले. अजित पी. नाकाडी यांनी आभार मानले. यावेळी सहशिक्षक ए. बी. पाटील, एस. एच. पाटील, एस. आर. कम्मार, पी. के. पाटील, जे. डी. बिर्जे, एस. एन. पाटील, पी. आर. खन्नुकर, के. बी. रंगाई, के. एस. सुळगेकर, मारुती गुंजीकर, अनिता गुंडोजी, नीता पाटील उपस्थित होते.