ऑनलाईन टीम / मुंबई :
पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी दिली.
अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे घेता येतील मात्र, रद्द करता येणार नाहीत, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यानंतर आज उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील. तसेच संपूर्ण सप्टेंबर महिना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील. तसेच या परीक्षा कमी मार्काच्या असतील त्यासोबतच शक्य झाल्यास घरातून परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली जाण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.








