वृत्तसंस्था/ मुंबई
25 फेब्रुवारीला समाप्त झालेल्या आठवडय़ामध्ये विदेशी चलन साठा 1.425 अब्ज डॉलर्सने घटला असल्याचे दिसून आले आहे. सदरचा विदेशी चलन साठा 631.527 अब्ज डॉलर्सवर राहिला आहे.
या आधीच्या आठवडय़ात मात्र विदेशी चलन साठय़ामध्ये तेजी दिसून आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. गेले काही आठवडे शेअर बाजारामध्ये घसरण अनुभवली जात असल्याने त्याचा फटका विदेशी चलन साठय़ात घट होण्यामागे दिसतो आहे. सतत होणारी घट ही गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब ठरते आहे. 18 फेब्रुवारीला संपलेल्या आठवडय़ात मात्र विदेशी चलन साठय़ात वाढ झाली होती. त्यावेळी विदेशी चलन साठा 2.762 अब्ज डॉलर्सने वाढत 632.952 अब्ज डॉलर्सवर राहिला होता.









