पुणे / प्रतिनिधी :
विदर्भात 7 फेब्रुवारीपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. तर मागील 24 तासांत मराठवाडा व विदर्भाच्या अनेक भागात अवकाळी पाऊस झाला असून, यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसामुळे राज्यातून थंडी गायब झाली असून, सोमवारी गोंदियात 11.8 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण-गोव्यामधील किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. सोमवारी गोंदियात 11.8 इतके किमान तापमान नोंदविण्यात आले आहे. पश्चिमी वाऱयाचा प्रभाव वाढल्याने उत्तरेकडील अनेक राज्यात हिमवर्षाव सुरू आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडे राहणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.









