पंढरपूर / प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱया विठ्ठलास `विठोबाराम कृष्ण हरे’ अशा नावाने ओळखले जाते. त्यामुळे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठोबास आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. तसेच विठोबाच्या मुकुटावर मोरपीस देखील लावण्यात आला. सोमवारी रात्री बारा वाजता मंदिर समितीच्या वतीने गुलाल उधळून कृष्णजन्म साजरा करण्यात आला.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये शेकडो वर्षांपासून कृष्णजन्म साजरा केला जातो. यासाठी परंपरेप्रमाणे गोकुळाष्टमीदिवशी रात्री बारा वाजता विठोबावर गुलालाची उधळण केली जाते. तसेच विठोबास भरजरी वस्त्रांची कुंची अर्पण केली जाते, तर लोण्याचा नैवेद्यही दाखवला जातो आणि कृष्णजन्म साजरा होतो. हीच परंपरा सोमवारी रात्री उशिराने देखील जोपासण्यात आली.
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने यंदा विठोबाचे संपूर्ण गर्भगृह फुलांनी तसेच फ्ढळांनी सजविण्यात आले होते. यामध्ये चारखांबी मंडप आणि गर्भगृहात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. यासाठी शेवंती, झेंडू, गुलाब अशा फुलांचा वापर झाला. तर सफ्ढरचंद, आंबा, संत्री, कलिंगड, सीताफ्ढळ, अननस अशा फ्ढळांची देखील विठोबास आरास करण्यात आली होती. सजावटीसाठी 500 किलो फळ आणि दोन हजार किलो फुले वापरण्यात आली. आरास पांडुरंग मोरे आणि नानासाहेब मोरे या हवेली (जि. पुणे) येथील भाविकाने केली. त्यामुळे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने विठोबाचे रूप अत्यंत मनोहारी दिसत होते.
एकंदर गोकुळाष्टमीचा उत्साह शहरात चौफ्ढळ्यात असणारे गोपाळकृष्ण मंदिर आणि गोपाळपूरच्या कृष्ण मंदिरामध्ये देखील दिसून आला. त्याठिकाणीही परंपरेप्रमाणे कृष्णजन्म करून रात्री बारा वाजता मानाची दहीहंडी फ्ढाsडण्यात आली. तर अष्टमीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराबाहेर देखील चांगलीच गर्दी करण्यात आली होती.









