पर्ये/वार्ताहर
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी मेहनत घेतल्याबद्दल सांखळी येथील निवृत्त सहाय्यक मुख्याध्यापक विजयकुमार चंद्रकांत वेरेकर यांना केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचा दोन लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला असून सोमवार दि.28 रोजी दिल्ली येथे आयोजित खास कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.विज्ञान क्षेत्र विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय करणे या गटात भारतातील फक्त दोघांनाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत.डॉ.नरेश यादव (हरयाणा) व विजयकुमार वेरेकर (सांखळी गोवा) हे आहेत.
या अगोदर त्यांना 1987 साली राज्य युवा पुरस्कार,2004 साली एअर इंडिया ब्र?ड ओउटलूक लर्नर टीचर अवार्ड (बोल्ट अवार्ड),2005 साली राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
विजयकुमार वेरेकर यांचा अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचे कुतूहल निर्माण करणे,वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे,विज्ञानाच्या दृष्टीने विचार करायला लावणे,मुलभुत माहित माहिती मिळवणे,संशोधनात्मक दृष्टीकोन निर्माण करणे यासारखे हेतू धरून श्री.वेरेकर यांनी 45 ते 50 प्रयोग ठिकठिकाणी सादर करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची रुची वाढवली आहे.त्यांनी बनविलेले विज्ञान प्रकल्प
या प्रयोगामध्ये कमीत कमी किमतीची साधने वापरण्यात आली आहेत .प्रयोग कुतूहल निर्माण करणारे,आनंद देणारे आणि त्यातून विज्ञान शिकविणारे आहेत .विद्यार्थीही यावेळी या प्रयोग सादरीकरणात उत्साहाने भाग घेतात व आपल्या मनातील शंका विचारून निरसन करतात .तसेच शिक्षकही या प्रयोगांचा लाभ घेऊन आपल्या विद्यालयात त्याची अंबलबजावणी करतात.आतापर्यंत
वेरेकर यांनी ’प्रयोगातून विज्ञान ’चे प्रयोग महाराष्ट्रातील गडहिंग्लज तालुक्मयातील कोल्हापूर जिह्यातील नूल येथील न्यू इंग्लिश स्कूल,टेक्नकिल व जुनियर कॉलेज येथे मराठी विज्ञान परिषद गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱया बाल विज्ञानिक संमेलनात केले आहेत.38 वर्षे त्यांनी विद्यादान केले आहे.प्रोग्रेस हायस्कुल सांखळी येथून ते सहाय्यक मुख्याध्यापक पदावर असताना निवृत्त झाले.स्थानिक पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत .आपल्या कार्याने त्यांनी प्रोग्रेस हायस्कूलची कीर्ती त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविली.विज्ञान प्रकल्प प्रदर्शनही त्यांनी भरविले आहे.तंबू ठोकून पाच पाच दिवस स्काउटचे केम्प त्यांनी घेतले.सांस्कृतिक,सामाजिक,पर्यावरण,राजकारण यातही त्यांनी कार्य केले आहे.विविध क्लब्सचे संस्थापक आहेत.सांखळी पंचायतीचे नगरपालिकेत रुपांतर करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा असून ते सांखळीचे पहिले नगराध्यक्ष होत.रवींद्र भवन,कचरा प्रकल्प,सांडपाणी निचरा प्रकल्प,स्विमिंग पूल साठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत.
त्यांनी गोवा, महाराष्ट्रात सांगली,कोल्हापूर,उत्तूर,नागपूर,गडहिंग्लज,बेळगाव येथे तसेच परदेशातही बेन्क?क ,टोकियो येथे प्रयोग सादर केले आहेत. श्री वेरेकर यांचे सहज सोपी माहिती असलेले ’छोटा सायन्सटीस्ट’ हे इंग्रजीमधून तर ’हांसत खेळत विज्ञान’ हे कोकणीतून 60 प्रयोगांचे पुस्तक प्रकाशित झाले तसेच विद्याभारतीतर्फे मराठी ,हिंदी,गुजराती आवृत्याही आल्या आहेत.आतापर्यंत सुमारे 500 पेक्षा जास्त ठिकाणी प्रगोग सादर केले आहेत.









