राधानगरी येथे पर्यटक निवासाची सोय
राधानगरी /प्रतिनिधी
अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांना सुरक्षित निवासाची सोय व्हावी या उद्देशाने विजय युवक गृह पर्यटकांना प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते वन्यजीव विभाग व त्यांच्या संकल्पनेतुन उभारण्यात आलेल्या पर्यटक निवास व विजय युवक गृहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
राधानगरी येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व त्यांच्या राहण्याची सोय व्हावी या उद्देशाने दिवंगत उपवनसंरक्षक विजय खेडकर यांच्या नावाने राधानगरी येथील हत्तीमहल येथे उभारण्यात आलेल्या विजय युवक गृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला
यामध्ये प्रामुख्याने दोन वातानुकूलित कक्ष व 24 बेडची सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे पर्यटकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
तसेच गेल्या वर्षी हत्तीमहल येथे गव्याच्या हल्ल्यात फेजीवडे येथील महिला केराबाई लक्ष्मण पोकम यांना अपंगत्व आल्याबद्दल वन्यजीव विभाग व आम, प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून पाच लाख रुपयांचा धनादेश त्यांचे नातेवाईक शंकर पोकम यांना सुपूर्द करण्यात आला
यावेळी वनक्षेत्रपाल सुहास पाटील, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, फेजीवडे सरपंच फारूक नावळेकर, दीपक शेट्टी, शिवसेना तालुका अध्यक्ष उत्तम पाटील, विश्वास राऊत, सचिन पालकर, मंगेश चौगुले, महेश मोरये, संतोष तायशेट्ये यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.









