एफएसएसएआयकडून सादर, पदार्थ ओळखण्यास होणार मदत
शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे सेवन करणारे लोक सर्वांनाच माहित असतील. पण या दोन प्रकारांशिवाय एक तिसराही प्रकार आहे. हा प्रकार विगन लोकांचा असून ते दुग्धजन्य पदार्थ आणि अंडीचं सेवन करत नाहीत.
विगन फुड हे पर्यावरणपूक असल्याचे सांगण्यात येते. याचमुळे बाजारात वेगवेगळय़ा वनस्पतींपासून मॉक मीट यासारखे अनेक पर्यायी पदार्थ उपलब्ध होत आहेत. विगनचा वाढता प्रसार पाहता भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) विगन खाद्यपदार्थांसाठी नवीन नियम सादर केले असून नवा लोगोही लाँच केला आहे.
शाकाहारी पदार्थ हिरव्या ठिपक्यात तर मांसाहारी पदार्थ लाल ठिपक्यात दर्शविण्यात येतात. त्याचप्रमाणे विगन पदार्थ आता नवीन हिरव्या रांगाच्या लोगोने दाखविण्यात येणार आहेत. भारत सरकारने विगन उत्पादनांना वेगळी ओळख प्राप्त करून देण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचबरोबर काही नियम सादर केले असून विगन पदार्थ तयार करताना त्यांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.









