बार्बाडोस : गुरुवारपासून न्यूझीलंडमध्ये दोन प्रथमश्रेणी सामने होणार असून यासाठी विंडीज अ संघात निकोलस पूरनची निवड करण्यात आली आहे. विंडीज मंडळ भविष्यात कसोटी संघासाठी त्याचा विचार करणार असल्याचेच या निवडीतून दिसून येत आहे.
25 वर्षीय पूरनने पूरनला केवळ तीन प्रथमश्रेणी सामने खेळण्याचा अनुभव आहे. विंडीज अ संघाचे दोन सामने 3 डिसेंबर रोजी माऊंट माँगनुई व 11 डिसेंबर रोजी नेल्सन येथे होणार आहेत.
@ विंडीज अ संघ : फॅबियन ऍलेन, एन्प्रुमाह बॉनर, जोशुआ दा सिल्वा, ब्रेन्डॉन किंग, काईल मेयर्स, प्रेस्टन मॅकस्वीन, शाईन मोसली, निकोलस पूरन, रोवमन पॉवेल, रेमन रीफर, जेडेन सील्स, रोमारिओ शेफर्ड, ओशेन थॉमस, हेडन वॉल्श.









