प्रतिनिधी / वास्को
वास्को रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी केलेल्या कारवाईत सुमारे 47 हजार 270 रूपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
वास्को रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाचे एम. आय. राठोड, दान सिंग मीना व पवन कुमार यांच्यातर्फे ही कारवाई करण्यात आली. रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाना बेवारस स्थितीत सहा बॅगा आढळून आल्या. या बॅगामध्ये मोठय़ा प्रमाणात देशी बनावटीच्या दारूच्या बाटल्य़ा होत्या. त्यांनी यावेळी या दारूच्या साठय़ा ािविषयी चौकशी केली असता, कोणीही या साठय़ावर दावा केला नाही.
जप्त करण्यात आलेल्या मद्य साठय़ात एकूण 176 दारूच्या बाटल्या होता. या मद्य साठय़ाची किंमत सुमारे 47,270 एवढी आहे. जप्त केलेला मद्यसाठा अबकारी खात्याकडे सुपूर्द करण्यात आला. दक्षिण पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त अलोक कुमार व विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मालकेडे यांनी या कारवाईबाबत रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचे अभिनंदन केले आहे.









