इस्लामपूर / प्रतिनिधी
वाळवा तालुक्यात आज कोरोना रुग्णांची संख्या वाढली. एकाच दिवसांत ३६ जणांना कोरोनाची बाधा झाली. या मध्ये सर्वाधिक १३ रुग्ण कापूसखेड येथील आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला असून लोकांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
तालुक्यात दिवसागणिक कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात शहर व वाळवा तालुक्यात कोरोनाचा कहर झाला होता. त्यामुळे धास्ती निर्माण झाली आहे. तालुक्यातील शनिवारची गावनिहाय पॉझिटिव्ह रुग्ण संख्या अशी इटकरे-६, मिरजवाडी-७, इस्लामपूर-४, जुनेखेड-२, बोरगाव-२, रेठरेधरण-१, नेर्ले-१.
वाळवा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी विनामास्कची कारवाई सुरु केली आहे.
Previous Articleपुढील आठवडयानंतर आंबा दर कमी होणार
Next Article मिरजेत किरकोळ करणातून तरुणाला भोसकले








