गरजूंना मोफत कपडय़ांचे वितरण
प्रतिनिधी / वाळपई
वाळपई मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षातील महिला संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱया काळात वेगवेगळय़ा स्तरावर प्रयत्न करण्यात येणार आहे .सध्या सर्व स्तरावर सरकार अपयशी ठरल्यामुळे महिला वर्ग मोठय़ा प्रमाणात त्रस्त झाला असून त्यांना वेगवेगळे स्तरावरून मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षातर्फे वेगवेगळय़ा स्तरावर पर्याय उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती वाळपई मतदारसंघ महिला काँग्रेस अध्यक्षा रोशन देसाई यांनी दिले आहे .
वाळपई मतदारसंघ महिला काँग्रेस तर्फे नानेली याठिकाणी मोफत कपडे वाटप यासंदर्भात कार्यक्रमात dया बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर नगरगाव जिल्हा पंचायत काँग्रेस उमेदवार उषा मेस्त व इतरांची खास उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना रोशन देसाई यांनी सांगितले की कोरोना रोगाच्या वाढत्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज समाजामध्ये आर्थिक दरी निर्माण होताना दिसत आहे. यामुळे सरकारने ही दूरी मिटविण्यासाठी वेगवेगळे स्तराचे पर्याय उपलब्ध करणे काळाची गरज बनलेली आहे .काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष असून आतापर्यंत सर्वसामान्यांच्या विकासासाठी वेगवेगळय़ा स्तरावर प्रयत्न करण्यात आलेले आहे. येणाऱया काळातही काँग्रेस पक्षातर्फे जनजागृती व स्वयंरोजगार विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येतील अशा प्रकारची माहिती यावेळी रोशन देसाई हिने उपस्थितांना दिली .
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना उशा मेस्त यांनी सांगितले की वाळपई मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाची यंत्रणा मजबूत होताना दिसत आहे. येणाऱया काळात वेगवेगळय़ा उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना एकसंघ करून त्यांच्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून पक्षातर्फे प्रयत्न करण्यात येतील अशा प्रकारचे उदगार त्यांनी काढले .यावेळी नानेली गावातील जवळपास 200 पेक्षा जास्त महिला भगिनींना मोफत कपडय़ांचे वितरण करण्यात आले .
यावेळी भगिनीने काँग्रेस पक्षातर्फे केलेल्या सहकार्य व मदती बद्दल समाधान व्यक्त करून वाळपई मतदारसंघ महिला काँग्रेस अध्यक्ष रोशन देसाई यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी या कार्यक्रमांमध्ये चुडीदार साडय़ा व महिलांसाठी उपयुक्त असलेले कपडे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.








