वाळपई प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील शेळप शिंगणे गावांमध्ये सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत 75ज्ञ् घर जळून खाक झाले असून जवळपास दोन लाखांची नुकसानी झाली आहे. वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेने युद्धपातळीवर धाव घेऊन केलेल्या कामगारीत सुमारे दीड लाखांची मालमत्ता वाचविण्यात आली आहे. सदर प्रकार गुरुवारी मध्यरात्री जवळपास 12:45 दरम्यान घडला. यामुळे गावात खळबळ निर्माण झाली असून अग्निशामक दलाच्या जवानानी न केलेल्या कामगिरीवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून यासाठी योगदान देणाऱया अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक केले आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील नगरगाव पंचायत क्षेत्रातील शेळप शिंगणे गावात मोहन गावकर यांच्या घराला 12:25 वा. अचानकपणे आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाल्यानंतर अग्निशामक दलाचे अधिकारी प्रशांत धारगळकर यांच्या नेतृत्वाखाली अग्निशामक दलाच्या यंत्रणेने त्वरित धाव घेतली.
बारा मिनिटात पोचली गाडी.
यासंदर्भाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या यंत्रणेत त्वरित धाव घेऊन सदर आग विझविण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. महत्त्वाचे म्हणजे वाळपई शहरातून जवळपास अकरा किलोमीटरच्या अंतर दलाच्या जवानांनी अवघ्या 12 मिनिटात पार केले. महत्वाचे म्हणजे सदर रस्ता पूर्णपणे ग्रामीण भागाचा असूनही रस्त्यावर मोठय़ाप्रमाणात भटकी गुरे असतात. सदर गुरांना हाकलीत दलाची गाडी अवघ्या बारा मिनिटांनी गावांमध्ये पोहोचली. यामुळे नागरिकांनाही समाधान व्यक्त केले.
सुमारे दोन लाखांचे नुकसान
दरम्यान अग्निशमन दलाच्या यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहन गावकर यांच्या घराला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली .या आगीत घरातील टीव्ही फ्रिज लाकडाच्या खाटा छप्पर कपडे असे जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे. त्याला लागलेल्या आगीमुळे घरातील कुटुंब आश्चर्यचकित झाले व याबाबतची वार्ता गावामध्ये पसरताच गावातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाची यंत्रणा पोहोचते तोवर नागरिकांनी बऱयाच प्रमाणात सहकार्य करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाच्या कामगिरीमुळे घरातील दोन खोल्या सुरक्षित राहिल्या तरी सुद्धा जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे. प्रशांत धारगळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास दीड लाखांची मालमत्ता वाचविण्यात यश आले आहे.
अग्निशामक दलाच्या जवानांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे दीड लाखांची मालमत्ता वाचविण्यात यश आले असून यात प्रमुख अधिकारी प्रशांत धारगळकर अशोक नाईक सुधाकर गावकर शैलेश डेगवेकर साईनाथ सावंत गोकुळदास डेगवेकर यांनी विशेष कामगिरी केली. सदर आग पूर्णपणे आटोक्मयात आणण्यासाठी जवळपास दोन तास अग्निशामक दलाच्या जवानांना कसरत करावी लागली.









