देशमुखनगर/प्रतिनिधी
वारणानगर ( लांडेवाडी ) तालुका सातारा येथील अगोदरच्या कोरोना बाधीतांच्या निकट सहवासातील तीन महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे संपूर्ण गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी केली आहे, तसेच प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली आहे, याचा परिणाम परिसरातील गावा वरती झाला आहे. परिसरातील
15 मे रोजी आतित गावापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणानगर ( लांडेवाडी) या गावात खाजगी गाडीने 1 कुटुंब (2 पुरुष आणि 3 महिला) ठाणे येथून आले होते. गावातल्या सुज्ञ लोकाकडून आणि आरोग्य विभागाकडून त्यांना गावात असलेल्या प्राथमिक शाळेत थांबविण्यात आले, त्यांच्या वैद्यकीय तपासणी दरम्यान एक 65 वर्षीय वृध्दाला आणि 27 वर्षीय तरुणाला ताप व घशाचा त्रास जानवू लागल्याने नांदगाव प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शनिवारी या दोघांच्या घश्यातील नमुने तपासनीसाठि पाठविले होते, रविवारी उशिरा या दोघांचे अहवाल पाँझेटिव्ह आले. तसेच त्यांच्या अतिसहवासातील तीन महीलांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे एकाच कंटुबातील पाच जण हे कोरोना बाधीत झाले आहेत यामुळे प्रसा सन यंत्रणा सज्ज झाली आहे.
या गावातील नागरिकांमधून आसा सूर येत आहे की पोलिस यंत्रणेन थोडे कडक धोरण अंवलंबण्याची गरज आहे. ग्रामस्थांनी पोलीस यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त केली आहे . या घटनेने जिल्हाप्रशासन सतर्क झाले असून संपूर्ण गाव मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहे. परिसरातील 3 किलोमीटर परिघात असलेली 5 गावे बफर झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सूरु असून कुटुंबाला होमकोरोनटाईन करणे तसेच आवश्यक असलेल्या तपासणी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळपासून आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. प्रशासनाने तात्काळ वारणानगर (लांडेवाडी) हे गाव मायक्रो कंटेन्मेंट झोन केले तर परिसरातील वेनेगाव, जावळवाडी, निसराळे, खोडद. खोजेवाडी ही 3 किलोमीटर परिघातील गावे बफर झोन म्हणून जाहीर केले. कुटुंबातील इतर सदस्यांचे घशातील स्त्रावांचे नमुने सोमवारी उशिरा तपासणीसाठी पाठविण्यात आले. जिल्ह्यधिकारी शेखर सिंह, सातारा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दा. गुं. पवार, नागठाणे आणि नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जे. कांबळे, डॉ. सि. पी. सातपुते, डॉ. एम. पी. रायबोळे यांनी भेट देऊन माहिती घेतली.
ग्रामसेवक पवार, गाव कामगार तलाठी कुंभार, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, परिसरातील आशा सेविका, गावचे सरपंच आणि सर्व सदस्य यावेळी उपस्थित राहून गावातील 451 लोकांची आरोग्यतपासणी व माहिती घेत आहेत. बोरगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नि. डॉ. सागर वाघ, स. उप.पो. नि. वर्षा डाळिंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी या गावात कडक बंदोबस्त करत आहेत तसेच बफर झोन सह परिसरातील गावामध्ये बंदोबस्त केला जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








