प्रतिनिधी / वारणानगर
येथील साखर कारखाना व उपपदार्थ संलग्नित इंटक प्रणित मान्यताप्राप्त वारणा साखर कामगार संघाची पंचवार्षिक निवडणूक आज शुक्रवार दि. २० रोजी बिनविरोध झाली.
वारणानगर ता.पन्हाळा येथील श्री वारणा साखर कामगार संघाची सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी संघटनेची निवडणूक वारणा समूहाचे प्रमुख आ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली असून एकवीस सदस्यांच्या कार्यकारणीत अनेक नवीन चेअऱ्यांना संधी मिळाली आहे.
नवनिर्वाचित कार्यकारीणी विभागवार बिनविरोध सदस्य असे प्रकाश दगडू पवार – पर्चेस, महिपती रामराव पायमल – व्हेईकल,नामदेव आनंदा पाटील – सुरक्षा, रामचंद्र कोंडी पाटील,प्रकाश आनंदा कापरे – केन अकौंटस, भारत विठठल यादव – गोडावून,प्रताप तुकाराम भोसले,प्रकाश ज्ञानदेव गिरवे – शेती,हंबीर गणपती पाटील – सिव्हिल,मधुकर बाळू पोवार – एचआरडी,रंगराव शामराव मोटे,विलास शंकर पवार – मॅन्युफॅक्चरिंग,दिपक जगन्नाथ खोत,महेश प्रताप पाटील, महादेव हंबीरराव पाटील. एकनाथ शामराव माने – इंजिनिअरिंग,महादेव शामराव पाटील डिस्टिलरी, हणमंत बाबूराव खोत – को.जनरेशन, अविनाश शंकर पाटील – पेपरमिल,विलास सदाशिव काटे – बिलटयूब,तानाजी बाजीराव पाटील – रिफायनरी यांची निवड झाली असून निर्वाचीत सदस्यानी बिनविरोध निवडणूकीबद्दल आ. विनय कोरे यांचा सत्कार केला.
वारणानगर ता. पन्हाळा येथे श्री वारणा साखर कामगार संघाच्या बिनविरोध निवडणूकी बद्दल आ. विनय कोरे यांचा सत्कार करताना महादेव पाटील, मधुकर पोवार, प्रकाश कापरे, रामचंद्र पाटील, भारत यादव व इतर सदस्य.









