अनेक ठिकाणी रस्ते बंद होण्याचा प्रकार : चोर्ला घाट परिसरात दरडी कोसळण्यास सुरुवात

प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयात बुधवारी दिवसभर धुवांधार पाऊस लागला. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत बनले. अनेक रस्त्यावर वादळी वाऱयामुळे नैसर्गिक पडझड होऊन झाडे पडल्याने रस्ते बंद होण्याचा प्रकार घडला. मात्र वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेने तात्काळ धाव घेऊन रस्ते मोकळे करण्यात यश मिळवले. चोर्ला घाट परिसरात धुवांधार पाऊस लागत असून यामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र या मार्गावरून वाहतुकीला अजूनपर्यंत व्यत्यय निर्माण झालेला नाही. मात्र रात्रभर अशाच प्रकारे पाऊस सुरू राहिल्यास या मार्गावर मोठय़ा प्रमाणात दरडी कोसळण्याची शक्मयता आहे.
सहा इंच पावसाची नोंद
गेल्या 24 तासात सत्तरी तालुक्मयात एकूण सहा इंच पावसाची नोंद झालेली आहे. बुधवारी सकाळपासूनच मोठय़ा प्रमाणात पाऊस लागत होता. वाळपई व ग्रामीण परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत बनले आहे. अग्निशामक दलाच्या यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात जाणाऱया अनेक रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडला.
यासंदर्भात अधिक माहिती देताना हवालदार अनंत गावस यांनी सांगितले की, वाळपई ठाणे मार्गावर कोपर्डे या ठिकाणी रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. त्याचप्रमाणे खोतोडा या गावात जाणाऱया प्रमुख रस्त्यावर माड पडल्यामुळे वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला. होंडा पोस्टवाडा येथे झाडाची फांदी पडल्यामुळे ट्रकाची किरकोळ नुकसानी झाली. पशुवैद्यकीय केंद्राकडे ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या यंत्रणेने तात्काळ धाव घेतल्यामुळे अनेक ठिकाणी बंद पडलेले रस्ते मोकळे झाले.
चोर्ला घाट परिसरात दरडी कोसळण्याची शक्यता
गोवा-कर्नाटक दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरामध्ये धुवांधार पाऊस लागत आहे. यामुळ गोवा-कर्नाटक दरम्यानच्या हद्दिवर गोवा परिसरामध्ये दरडी कोसळण्यास सुरुवात झालेली आहे. एकूण मिळालेल्या माहितीनुसार काही दगड प्रमुख रस्त्यावर आलेले आहेत. यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करताना सतर्क राहण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यंत्रणेकडून करण्यात आलेले आहे. रात्री उशिरापर्यंत सदर भागांमध्ये धो-धो पाऊस लागत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पावसाचे सत्र असेच सुरू राहिल्यास दरडी कोसळण्याची शक्मयता आहे. दरम्यान यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग विभागाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पावसाळय़ात सदर रस्त्याचे व्यवस्थापन करण्यास यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. यदाकदाचित दरडी कोसळण्याचा प्रारंभ झाल्यास ताबडतोब यंत्रणा पाठवून त्या हटविण्याची पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा कोणत्याहीक्षणी दरडी कोसळण्याची शक्मयता आहे. या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस लागत असतो. परिणामी डोंगराळ भागातून पाण्याचा प्रवाह मोठय़ा प्रमाणात खाली येत असतो. यातून दरडीची माती रस्त्यावर पसरण्याची शक्मयता असते. यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सध्यातरी काही प्रमाणात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असल्या तरीसुद्धा वाहतुकीला अजूनपर्यंत आडकाठी निर्माण झालेली नाही.
दरम्यान, गेल्या 24 तासात सत्तरी तालुक्मयातील अनेक ग्रामीण भागामध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे सत्तरीच्या घाटमाथ्यावर मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत हळूहळू वाढ होऊ लागलेली आहे. अशाच प्रकारे पाऊस धुवांधार लागल्यास पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्मयता आहे.
आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित
दरम्यान, गोवा सरकारच्या उत्तर गोवा जिल्हाधिकारी यंत्रणेतर्फे सत्तरी तालुक्मयातील आपत्कालीन नियंत्रण कक्ष सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदार कचेरीत सुरुवात करण्यात आला आहे. हा नियंत्रण कक्ष 24 तास सुरू राहणार असून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी 237 42 43 या क्रमांकावर संपर्क साधून त्यासंदर्भाची माहिती देण्याचे आवाहन सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर व मामलेदार दशरथ गावस यांनी केले आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्या संदर्भाची यंत्रणा ताबडतोब कामाला लागून नागरिकांना मदतकार्य सुरू करण्यावर भर देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.









