पणजी / प्रतिनिधी
ऑक्सिजन पुरवठा आणि वितरण या वादात पडण्याची सध्याची वेळ नाही, तर तो कोरोना रुग्णांना सुरळीतपणे मिळणे महत्त्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या काही दिवसात ऑक्सिजनची समस्या सुटेल अशी आशा वर्तवली आहे. तसेच गोमेकॉत (बांबोळी) व दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलात अशा दोन ठिकाणी 15 मे पुर्वी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्याचा इरादा त्यांनी प्रकट केला आहे.
ऑक्सजिनची वाढती मागणी आणि द्रव गॅसच्या कमतरतेमुळे होत असलेल्या अनेक मृत्यूची दखल घेताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, काही दिवसांत ऑक्सजिनचा पुरवठा सुरळीत होईल. “ऑक्सजिनच्या पुरवठयात वाढ होण्यासाठी आपण आधीच केंद्र आणि उत्पादकांच्या संपर्कात आहे. त्याशिवाय गोवा वैद्धकीय महाविद्यालय (गोमेकॉ ) आणि दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात 15 मेपूर्वी हे दोन प्रकल्प सुरू होतील, अशी आमची अपेक्षा आहे. यामुळे गोव्यातील ऑक्सजिनची कमतरता आणखी कमी होईल’’, मुख्यमंत्री म्हणाले, की
5 हजार लीटर क्षमतेचे ऑक्सजिन टँक आता दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात (एसजीडीएच) स्थिर पुरवठा करीत आहे. ‘पीएसए ऑक्सजिन’ प्लांì प्रति मिनिट 600 लिटर 15 मे 2021 पर्यंत सुरू होण्याची शक्मयता आहे. ‘एसजीडीएच’ प्लांìमध्ये सर्व उपकरणे आली असल्यामुळे प्रथम पुरवठा सुरू होऊ शकतो ,आणि तंत्रज्ञ आता केवळ फिल्टरची प्रतीक्षा करीत आहेत.मूळ यंत्रणा तयार आहे आणि एकदा फिल्टर आल्यानंतर हा प्लाट स्थापित करुन कार्यान्वति होईल,’’ असे ते म्हणाले.
त्याचप्रमाणे ते म्हणाले, की गोवा मेडिकल कॉलेजमधील सुपर स्पेशॅलिटी ब्लॉक गुरुवारी कार्यान्वति होत आहे. या सुविधेत 20,000 लिटर ऑक्सजिन टाकी बसवण्यात आली आहे. सुरुवातीला कोरोना रूग्णांसाठी 150 ऑक्सजिन बेडचा वापर केला जाईल आणि आवश्यकतेनुसार ते वाढवले जाईल.









